कांचन नगरातील महाविद्यालयीन तरुणी बेपत्ता

जळगाव प्रतिनिधी । महाविद्यालयात जाते, असे सांगून घराबाहेर पडलेली वीस वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची घटना गुरूवारी सकाळी घडली.

या प्रकरणी तक्रारीवरून मिसिंग जिल्हापेठ पोलिसात दाखल करण्यात आली आहे. शहरातील कांचननगर येथे कुटुंबासह ही युवती वास्तव्यास होती. ती बेंडाळे महाविद्यालयात शिक्षण घेतेय. बुधवारी सकाळी महाविद्यालयात जाते, असे सांगून ती घराबाहेर पडली. परंतु उशिरापर्यंत ती घरी पतरली नाही. कुटुंबीयांनी तिचा महाविद्यालय तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला असता तपास लागला नाही. याप्रकरणी आज नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून हरविल्याची नोंद जिल्हापेठ पोलीस स्टेशनला करण्यात आली. तपास पोलीस नाईक फिरोज तडवी हे करीत आहेत.

Protected Content