गिरीशभाऊंवरील आरोप बिनबुडाचे- अरविंद देशमुख ( व्हिडीओ )

arvind deshmukh जळगाव प्रतिनिधी । ना. गिरीश महाजन यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे असून ते अविरतपणे पूरग्रस्तांची मदत करत असल्याचे प्रतिपादन त्यांचे जनसंपर्क अधिकारी अरविंद देशमुख यांनी केले आहे.

याबाबत वृत्त असे की, जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन हे कालपासूनच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले आहेत. त्यांनी स्वत: पूरग्रस्तांना भेट देऊन आपत्ती निवारणाची पाहणी केली. या अनुषंगाने काल सोशल मीडियात आलेला एक व्हिडीओ आज जोरात व्हायरल झाल्याने ना. महाजन यांच्यावर टीका करण्यात आली आहे. या सेल्फी व्हिडीओत ते हसतांना दिसत असल्यामुळे ते असंवेदनशील असल्याची टिकास्त्र नेटकर्‍यांनी सोडले आहे. या पार्श्‍वभूमिवर, ना. गिरीश महाजन यांचे जनसंपर्क अधिकारी अरविंद देशमुख यांनी एका लाईव्ह व्हिडीओच्या माध्यमातून त्यांची बाजू मांडली आहे.

या व्हिडीओमध्ये अरविंद देशमुख म्हणतात की, ना. गिरीशभाऊ महाजन यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वप्रथम धाव घेतली असून सर्वांना मदत केल्याशिवाय ते तेथून बाहेर पडणार नाहीत ही निश्‍चीत बाब आहे. मात्र काही जण त्यांच्यावर अकारण टीका करत आहेत. गिरीशभाऊंनी सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून सैन्यदलाच्या खांद्याला खांदा लाऊन पूरग्रस्तांची मदत केली असतांना त्यांच्यावर असंवेदनशीलतेचा करण्यात आलेला आरोप बिनबुडाचा असल्याचे प्रतिपादन अरविंद देशमुख यांनी केले आहे.

पहा : अरविंद देशमुख यांनी मांडलेल्या बाजूचा व्हिडीओ.

https://www.facebook.com/arvind.deshmukh.9/videos/1801285003307450

Protected Content