कोल्हापूर (वृत्तसंस्था) कोल्हापूर, सांगलीत सध्या पुराने थैमान घातले असून अनेकांचे जीव गेलेत. तर हजारो जणांचे संसार उघडे पडले आहेत. अशा कठीण परिस्थितीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे पुराची पाहणी करताना एका सेल्फी व्हिडीओत चक्क हसत, हात दाखवत आहे. या व्हीडीओमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली असून ना. महाजन यांच्या असंवेदनशील वागण्यावर चहुबाजूने टीका होतेय.
गिरीश महाजन यांचा हा व्हिडीओ कोल्हापुरमधील असून ना. महाजन हे पोलीस अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बोटीत बसून पुराची पाहणी करताना दिसत आहेत. यावेळी एक व्यक्ती हातात मोबाइल घेऊन सेल्फी व्हिडीओ काढताना दिसतोय. या व्हिडीओत आपण फ्रेममध्ये आल्यानंतर गिरीश महाजन हसत हात हलवताना दिसताय. एवढेच नव्हे तर, ना. महाजन हे त्या व्यक्तीस आजूबाजूची पूरपरिस्थिती देखील व्हीडीओत घेण्याच्या सूचना करताय. अशा कठीण प्रसंगी हसून दाद दिल्याने गिरीश महाजन यांच्यावर टीका होत असून त्यांच्यातील संवेदनशीलता खरंच हरवली आहे का? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.