दूध संघाच्या संचालकांवर कारवाईस विलंब का ? : अरविंद देशमुखांचे निवेदन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा दूध संघातील प्रशासक मंडळाने आज पोलीस निरिक्षकांना दिलेल्या निवेदनातून संचालक मंडळाने बेकायदेशीररित्या दूध संघात प्रवेश करून बैठक घेऊन देखील कारवाई का केली नाही ? अशी विचारणा केली आहे. याबाबत अरविंद देशमुख यांनी आज निवेदन सादर केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा दूध संघातील वाद आता चिघळला आहे. प्रशासक मंडळाने ताबा घेऊन संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलेले आहे. तथापि, असे असतांनाही २ ऑगस्ट रोजी मंदाताई खडसे यांच्यासह त्यांच्या संचालक मंडळातील ११ संचालकांनी अनधिकृतरित्या जिल्हा दूध संघाच्या आवारात बेकायदेशीररित्या प्रवेश करुन दूधसंघाच्या मिटींग हॉलमध्ये बैठक घेतल्याचा आरोप प्रशासक मंडळाने केला होता.

या संदर्भात प्रशासक अरविंद देशमुख यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार देखील दाखल केली होती. यापुढे संचालक मंडळाने बेकायदेशीररित्या प्रवेश केल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होवून गुन्हा घडल्याची शक्यता अरविंद देशमुख यांनी तक्रारीव्दारे व्यक्त केली असून संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी असेही तक्रारीत म्हटले होते.

दरम्यान, या संदर्भात शहर पोलीसात तक्रार दाखल करून देखील आजवर गुन्हा दाखल न झाल्यामुळे अरविंद देशमुख यांनी शहर पोलीस स्थानकाचे निरिक्षक यांना निवेदन सादर केले आहे. यात संबंधीतांवर कारवाई करण्यासाठी विलंब का होत आहे ? अशी विचारणा करण्यात आली आहे. तसेच संचालक मंडळ पुन्हा एकदा बैठक घेण्याची तयारी करत असून यातून कायदा व सुव्यवस्थेची काही अडचण निर्माण झाल्यास पोलीस प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

Protected Content