जळगाव प्रतिनिधी । ख्यातप्राप्त चित्रकार योगेश सुतार यांच्या कलाकृतींना जगभरातून कौतुकाची थाप मिळाली आहे. त्यांच्या वाटचालीचा आढावा ऐका खुद्द त्यांच्याकडूनच.
चित्रकार योगेश सुतार हे मूळचे धरणगाव येथील रहिवासी होत. बालपणापासूनच त्यांचा पारंपरीक शिक्षणात अरूची असली तरी चित्रकलेची आवड होती. यामुळे त्यांनी कलेमध्येच करियर करण्याचा निर्धार केला. यात अनेक अडचणींवर मात करून त्यांनी चित्रकलेच्या क्षेत्रात नावलौकीक कमावला आहे. देश-विदेशात त्यांच्या चित्रांची प्रदर्शने आयोजित होत असून याला रसिकांसह समिक्षकांचीही दाद मिळाली आहे.
जळगाव येथील पु.ना. गाडगीळ कला दालनात योगेश सूतार यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते. यानंतर ते आता येथे प्रत्येक रविवारी सायंकाळी चार वाजता लाईव्ह पोर्ट्रेट रेखाटत असतात.
पहा:- योगेश सुतार यांच्या आजवरच्या वाटचालीची माहिती.