Home Cities जळगाव पु. ना. गाडगीळ कला दालनातील शिवउत्सव चित्र प्रदर्शनास प्रतिसाद (व्हिडीओ)

पु. ना. गाडगीळ कला दालनातील शिवउत्सव चित्र प्रदर्शनास प्रतिसाद (व्हिडीओ)

0
53

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पु.ना. गाडगीळ कला दालनातील शिवउत्सव चित्र प्रदर्शनास रसिकांचा प्रतिसाद लाभला आहे.

जळ्गाव शिवजयंती निमित्त स्थानिक युवा चित्रकारांनी काढलेल्या जनतेचा राजा शिवछत्रपती यांच्यावर काढलेल्या चित्रप्रदर्शनाचे उदघाट्न जळगावचे नवनियुक्त जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, माजी जिल्हाधिकारी तथा सचिव महसूल विभाग मंत्रालय किशोरराजे निंबाळकर, संगीताराजे निंबाळकर यांनी पु. ना. गाडगीळ कला दालनात केले.

युवा चित्रकार योगेश सुतार यांच्या संकल्पने्नुसार जळगावातील ४१ युवा चित्रकारांनी शिवाजी महाराजांचे जलरंग, आईल, अ‍ॅक्रलीक, पेन्सील आदी माध्यमातून चित्र काढलेली आहेत. याप्रसंगी ललित कला महाविद्यालयाचे प्राचार्य जितेंद्र भारंबे, वंदना पवार परमार, रुपाली सोनवणे, सुमेरसिंग चव्हाण, पुना गाडगीळचे व्यवस्थापक खेमराज, ललीत कला महाविद्यालयातील विद्यार्थी , पालकवर्ग आदी उपस्थीत होते.

पहा– पु.ना. गाडगीळ कला दालनातील चित्रप्रदर्शनाबाबतचा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound