देशात कोरोनाच्या नवीन फ्लर्ट व्हेरिंयटचे आगमन; महाराष्ट्रासह देशात ३०० हून अधिक रूग्ण

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोरोनाची डोकेदुखी संपली असे कुठे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनामुळे जगाची चिंता वाढली आहे. जगात नवीन कोरोना व्हेरियंटमुळे चिंता वाढली असताना आता भारतातही नवीन कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. सिंगापूरमध्ये कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या फ्लर्ट प्रकाराचे रुग्ण आढळले होते. आता भारतातही कोरोनाच्या फ्लर्ट व्हेरियंटच्या रुग्णांची नोंद झाली आहे.

भारतात कोरोनाच्या नवीन फ्लर्ट व्हेरियंटच्या 300 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या फ्लर्ट व्हेरियंटचे सुमारे 100 रुग्ण आढळले आहेत. देशात फ्लर्ट व्हेरियंटच्या 324 रुग्णांची नोंद झाली आहे. देशात महाराष्ट्रासह गोवा, कोलकाता, ओडिसा, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत.

Protected Content