प्रज्ञासिंहला उमेदवारी देणे घटनेचा अवमान : सामाजिक संघटनांचा आरोप

35506ca6 e407 4ff5 9190 9e0f2f719df9

भोपाळ (वृत्तसंस्था) येथून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर लोकसभेसाठी उमेदवारी करीत असलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर ह्या मालेगाव व समझोता एक्सप्रेससह अन्य काही प्रकरणात आरोपी आहेत. प्रकृतीच्या कारणासाठी त्या जामिनावर कारागृहाबाहेर आहेत. अशी पार्श्वभूमी असलेल्या महिलेला निवडणुकीत उमेदवारी देणे, हा भारतीय घटनेचा अवमान आहे, असा आरोप काही सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे.

 

या पत्रकात त्यांनी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर न्यायालयात असलेल्या काही आरोपांचा उल्लेखही त्यांनी केला असून अशा व्यक्तीला उमेदवारी देणाऱ्या पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या पत्रकावर राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार, राज्याच्या मूलनिवासी मुस्लीम मंचचे अध्यक्ष अंजुम इनामदार, कर्नाटक राष्ट्र सेवा दलाचे आप्पासाहेब येर्नाले व अलिबाबा लोहिया, कर्नाटक विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष बी.आर. पाटील, मध्य प्रदेशचे माजी आमदार डॉ. सुनिलम, भोपाल राष्ट्रीय एकता मंचचे लज्जा शंकर हरदेनिया आणि डॉ. रागीब अहमद यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Add Comment

Protected Content