जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | हाफकिन अजिंठा फार्मसुटिकल्स कंपनीतून १७ किलो तांब्याचे पाईप मध्यरात्रीच्या सुमारास दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरणाऱ्या ज्ञानेश्वर रतन सोनार (वय-२५) व विनोद गोपाळ मोरे (वय-२२) यांना २२ जुलै रोजी अटक केली होती. ते पाईत विकत घेणाऱ्या शेख सईद रफिक शहा (वय ५३, रा. रजा कॉलनी) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्या तिघांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील हाफकिन अजिंठा फार्मसुटिकल्स लि. कंपनीतून सुमारे १८० फुट लांब १७ किलो वजनाची ६३ हजारांची तांब्याची पाईपलाईन चोरी झाल्याची घटना २० जुलै रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही चोरी ज्ञानेश्वर सोनार, गोपाळ मोरे यांनी दोन अल्पवयीन बालकांच्या मदतीने केल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला मिळाली. त्यानुसार अल्पवयीन मुलांसह दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, ते चोरलेले पाईप रामनगरातील भंगार व्यावसायीक शेख सईद रफिक शहा याला विकल्याचे चोरट्यांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी भंगार व्यावयीकाला देखील ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरलेले पाईप देखील हस्तगत करण्यात आले आहे. अटकेतील तिघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोहेकॉ सचिन मुंंढे, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, गणेश ठाकरे, सिद्धेश्वर डापकर, साईनाथ मुंढे, ललित नारखेडे, किरण पाटील, छगन तायडे यांच्या पथकाने केली.