परभणी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | परभणी येथे एका अल्पवयीन मुलीवर कळमनुरी व परभणी येथे अत्याचार करणाऱ्या एका तरुणावर कळमनुरी पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत मंगळवारी ता. 18 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सदर तरुणाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी येथील एक मुलगी कळमनुरी येथे असताना शहरातील अफरोज कुरेशी या तरुणाने तिचा सतत पाठलाग करून विनयभंग केला. त्यानंतर कळमनुरी येथे त्या मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर सदर मुलगी परभणी येथे गेल्यानंतरही त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. यामुळे सदर मुलगी गरोदर राहिली होती. काही दिवसांपूर्वीच त्या मुलीने परभणी येथील शासकिय रुग्णालयात एका बाळास जन्म दिला.
त्यानंतर सदर मुलीने परभणी येथील मोंढा पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. यामध्ये अफरोज कुरेशी याने ता. 1 जून 2019 रोजी तसेच इतर वेळी तिच्यावर जबरीने अत्याचार केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. त्यावरून परभणीच्या मोंढा पोलिसांनी अफरोज कुरेशी याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. सदर घटना कळमनुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे पोलिसांनी सदर गुन्हा कळमनुरी पोलिस ठाण्याकडे वर्ग केला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अफरोज यास ताब्या्त घेतले. पोलिस निरीक्षक मोहन भोसले, उपनिरीक्षक संतोष इंगळे पुढील तपास करीत आहे