वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलीसांनी पकडले

जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील खोटे नगर परिसरातून बेकायदेशीर वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर जळगाव तालुका पोलीसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी मंगळवार ४ जुलै रोजी सकाळी ८ वाजता ट्रॅक्टर चालकाविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोटे नगर परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती प्रभारी अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी आप्पासो पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने मंगळवारी ४ जुलै रोजी पहाटे ५.३० वाजता कारवाई केली. यावेळी ट्रॅक्टर चालक सचिन अशोक सपकाळे (वय-२४) रा. कुंभारवाडा, निमखेडी, जळगाव याच्याकडे वाढू वाहतुकीबाबत विचारणा केली. त्याने उडवा उडवीची उत्तरे दिले. त्यानंतर पोलिसांनी ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १८, ७९३२) हे वाहन जप्त केले आहे. पोलीस नाईक किरण आगोणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक सचिन अशोक सपकाळे यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल लीलाधर महाजन करीत आहे.

Protected Content