अर्जुन खोतकर यांची शिवसेना उपनेतेपदी निवड

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पक्षात उभी फूट पडल्यानंतरही उध्दव ठाकरे यांच्यासोबत असणारे अर्जुन खोतकर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

शिंदे गटाने राज्यात सत्ता हस्तगत केल्यानंतर आता शिवसेनेने कारवाईला प्रारंभ केला आहे. यात प्रामुख्याने निष्ठावंतांना पदे देऊन बंडखोरांशी हातमिळवणी करण्याची हकालपट्टी करण्यात येणार असल्याचे मानले जात होते. आणि त्याच प्रमाणे कारवाई करण्यास प्रारंभ झाल्याचे दिसून येत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अर्जुन खोतकर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेतर्फे याची अधिकृत माहिती जारी करण्यात आली आहे. खोतकर हे जुने शिवसैनिक असून अतिशय आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी टाकून मराठवाड्यात पक्षाला बळकटी देण्याचा उध्दव ठाकरे यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शिंदे गटासोबत गेलेले विजय नाहटा आणि विजय चौगुले यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. याच प्रकारे आता बंडखोरांची हकालपट्टी करून निष्ठावंतांना पदे देण्यात येतील असे स्पष्ट झाले आहे.

Protected Content