जुन्या नाशिकमध्ये आजी-माजी आमदार यांच्यात मतदान केंद्रावर वाद

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. परंतू आता जुन्या नाशिकमधून वाद दोन पक्षात वाद झाल्याची बातमी समोर आली आहे. जुन्या नाशिक परिसरामध्ये असलेल्या मतदान केंद्रांवर माजी आमदार वसंत गीते आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यात बाजाबाची झाली आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोरासमोर येऊन घोषणाबाजी केल्यामुळे काही काळ परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर शहरातील भद्रकाली पोलिस ठाण्यासमोर देखील भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आणि माजी आमदार वसंत गीते यांचे समर्थक समोरासमोर आले होते.

शहरातील मौलाना अबुल कलाम आझाद शाळेत असलेल्या मतदान केंद्रांवर मोठ्या संख्येने नागरिक एकत्र जमा झाले होते. याची तक्रार देवयानी फरांदे यांनी केली होती. त्यानंतर वसंत गीते देखील त्या ठिकाणी दाखल झाले. दोन्ही बाजूंच्या समर्थकांकडून एकमेकांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे या मतदान केंद्र परिसरामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. या सर्वांची तक्रार आपण पोलिस आयुक्तांकडे करणार असल्याचे देवयानी फरांदे यांनी सांगितले आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने नाशिक मध्ये पैशांचे वाटप सुरू असल्याचा आरोप भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे. तर त्याला उद्धव ठाकरे गटाने देखील प्रत्युत्तर दिले आहे.
मतदारांमध्ये महाविकास आघाडीला मतदान करण्याचा उत्साह दिसून येत आहे.

Protected Content