यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आदिवासी अनुदानीत आश्रमशाळांमधील शिक्षकांनी १७ सप्टेंबर रोजी क्षमता परिक्षा होणार आहे.
यावल येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी जिल्ह्यातील आदिवासी विभागाच्या अंतर्गत येणार्या शासकीय व अनुदानीत आश्रमशाळांमधील शिक्षकांची क्षमता चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने राज्य शासनाच्या निर्देशानुसार १७ सप्टेंबर रोजी शासकीय १७ तर अनुदानीत ३२ आश्रमशाळांमधील शिक्षकांची क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे.
आश्रमशाळांमधील शिक्षकांचे ज्ञान अद्ययावत व्हावे, त्यांना स्वयंअध्ययनाची आवड विकसित व्हावी व स्पर्धात्मक वातावरण निर्मित होण्यासाठी ही क्षमता चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती यावल येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.