यावल येथील महाविद्यालयात सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांची भेट

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील महाविद्यालयात विद्यापीठाचे सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती जाणुन घेतली.

सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव मार्फत विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागा मार्फत विविध उपक्रम राबविले जातात. यात त्यांनी G- 20 युवा संवाद@ 2047 याबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमात महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिनेट सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.ए.पी. पाटील प्रा.एम.डी. खैरनार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. हेमंत येवले, किमान कौशल्य विभागाचे प्रा.मुकेश येवले, डॉ. एस. पी. कापडे, डॉ. एच. जी. भंगाळे, डॉ. आर. डी. पवार डॉ. पी. व्ही. पावरा आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मिलिंद बोऱघडे, संतोष ठाकूर, रमेश साठे, डी. डी. पाटील यांनी परिश्रम घेतले.

Protected Content