युनिक अकॅडमीतर्फे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

0

अमळनेर प्रतिनिधी । शहरातील नांदेडकर सभागृहात द युनिक अकॅडमीतर्फे स्पर्धा परिक्षेची तयारी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

या शिबिरात लेखक व मार्गदर्शक मिलिंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना गणित या विषयावर विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी एमपीएससी/युपीएससीची तयारी कशी करावी ? कोणती पुस्तके वाचावी ? या बाबत शंका निरसन केले. जळगाव शाखा प्रमुख सुनील देशमुख यांनी आगामी परीक्षा व संधी या बाबत संवाद साधला
मुलांच्या विविध प्रश्‍नांची उत्तरं देतांना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व त्यांना पटवून दिले. प्रास्तविक पवन लोहार यांनी केले तर आभार नरेंद्र पाटील यांनी मानले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!