भाजपाच्या ११० उमेदवारांच्या नावांना मंजूरी; लवकरच यादी जाहीर होणार

नवी दिल्ली लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । महाराष्ट्र राज्या विधानसभेचा बिगुल वाजला असून आता प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांची नावांची यादीची उत्सुकता लागून आहे. महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरणाऱ्या ११० उमेवारांच्या नावांना मंजूरी देण्यात आली असून लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

 

सुत्रांकडून मिळालेली माहितीनुसार, भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. महाराष्ट्रातील ११० जागांसाठी उमेदवारांची नावांची यादी निश्चित करण्यात आली आहे. उर्वरित जागांवर उमेदवारांची नावे निश्चित करण्याची जबाबदारी भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर सोपविण्यात आली. उर्वरित जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी पुन्हा बैठक होणार नाही. यापुढील जागावाटपाची चर्चा महायुतीमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत होणार आहे. दरम्यान नवीन चेहरे आणि विजयी होऊ शकणाऱ्या उमेदवारांना भाजपाकडून प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती असून जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.

Protected Content