जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिल्हास्तरीय आत्महत्याग्रस्त शेतकरी समितीची बैठक जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत ११ प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्याग्रस्त शेतकरी समितीकडे १८ मदत प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यानुसार आत्महत्याग्रस्त शेतकरी समितीच्या बैठकीत प्राप्त १८ प्रस्तावांपैकी पात्र असलेल्या ११ प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. यात गुलाब गोपीचंद कोळी. निम, कोकिळाबाई संजय पाटील. मेहेरगाव ता. अमळनेर, ज्ञानेश्वर पांडुरंग पाटील तोंडापूर, उत्तम अमरसिंग नाईक. खडकी, भागवत रामदास साठे. चिंचखेडा, संदीप दिगंबर पाटील. किन्ही ता.जामनेर, काळू भादू पाटील. निमगव्हाण ता.चोपडा, रमेश नामदेव महाजन. टाकळी ता.पाचोरा, समाधान रघुनाथ पाटील भिलाली. ता.पारोळा, ज्ञानेश्वर गंगाराम धनगर. (दुधंबे) कलमडू ता. चाळीसगाव आणि हिंमत फकीरा पाटील खडके ता. एरंडोल असे पात्र असलेल्या ११ प्रस्तावाना मंजुरी देण्यात आली. तर ३ प्रस्ताव अपात्र असल्याने फेटाळण्यात आले. उर्वरित ४ प्रस्ताव फेरचौकशीसाठी तालुकास्तरावर परत पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.