यावल प्रतिनिधी । येथील तालुक्यातील सप्टेंबर २०२० मध्ये मुदत संपणाऱ्या ४८ ग्राम पंचायतीच्या मुदती संपल्याने जळगाव जिल्हा परिषदचे मुख़्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या आदेशान्वये या सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांची यादी गावनिहाय पुढील प्रमाणे :- मोहराळे, कोरपावली, महेलखेडी-सहाय्यक गट विकास अधिकारी एल. आय. तडवी कासवे, पिंप्री, टाकरखेडे, मारुळ, दहीगाव, हंबर्डी, भालोद, बोरखेडा बुदुक-ग्राम पंचायत विस्तार अधिकारी के. सी. सपकाळे, भालशिव, बामणोद, आमोदा, कोसगाव, वनोली, सांगवी बुद्रुक, पिंपरुळ, विरोदा या ग्रामपंचायतीसाठी -सामान्य प्रशासन अधिकारी एन. पी. वैराळकर, वढोदे प्र. सावदा, पिळोदे खुर्द, मनवेल- कृ अ. पं. स. शितल पाटील, अंजाळे, राजोरे, सातोद, सांगवी खुर्द, निमगाव, बोरावल बुद्रुक, कृषी विस्तार अधिकारी डी. पी. कोते, आडगाव, उंटावद, चिंचोली, बोरावल खुर्द, डोणगाव-कृषी विस्तार अधिकारी डी. एस. हिवराळे, शिरसाड, कोळवद, डोंगरकठोरा, दुसखेडा कनिष्ठ अभियंता एस. सी. वानखेडे, वढोदे प्र. यावल, नायगाव, किनगाव बुद्रुक, अट्रावल, नावरे, डांभुर्णी -कनिष्ठ अभियंता आर. बी. इंगळे , विरावली, वउ्री, सावखेडासीम सहाय्यक अभियंता टि. एल. भारंबे यांच्या यावल तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींवर प्रशासकांच्या नियुक्ती करण्यात आल्या असल्याची माहीती यावलचे तहसीलदार जितेन्द्र कुवर यांनी दिली आहे .