Home धर्म-समाज ‘गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन’च्या तालुका अध्यक्षपदी जगदीश कवडीवाले यांची नियुक्ती

‘गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन’च्या तालुका अध्यक्षपदी जगदीश कवडीवाले यांची नियुक्ती

0
34

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील शिवसेनेचे शहर प्रमुख व सोने चांदीचे सराफा व्यापारी जगदीश कवडीवाले यांची नुकतीच राज्यस्तरीय ‘गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन’च्या यावल तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

यावल शहरातील सोने चांदी व्यवसायातील प्रदीर्घ अनुभव व यावल शहरातील अनेक बँकाचे सोने तारण व्हॅल्यूएशनचा अनेक वर्षांचा अनुभव बघता त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यस्तरीय महाराष्ट्र गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिशनचे प्रदेश अध्यक्ष पुरुषोत्तम काळे, उपाध्यक्ष नचिकेत भुर्के, संघटक भैय्या भामरे यांच्या सयुंक्तिक स्वाक्षरीने जारी नियुक्ती पत्राद्वारे जगदीश रत्नाकर कवडीवाले यांची निवड करण्यात आली आहे. सर्व सोने, चांदीच्या व्यापाऱ्यांनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या या निवडीचे स्वागत करून अभिनंदन केले आहे.

 


Protected Content

Play sound