जळगाव प्रतिनिधी | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटीकडून नियुक्त जिल्हा सरचिटणीस व ब्लॉक अध्यक्ष पदाच्या नियुक्तीस मान्यता देण्यात आली.
त्यामध्ये जमील शेख शफी यांची जिल्हा प्रशासन सरचिटणीस, मनोज सोनवणे यांची संघटन सरचिटणीस तर ज्ञानेश्वर कोळी यांची जनसंपर्क सरचिटणीस नियुक्ती करण्यात आली.
या सोबतच तीन ब्लॉक अध्यक्ष नियुक्त केले असून भरत पाटील यांची बोदवड ब्लॉक, दिनेश पाटील यांची मुक्ताईनगर ब्लॉक व प्रदीप पाटील यांची चोपडा तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा काँग्रे चे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार तसेच जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेकडून नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.