पारोळा तालुक्यातील 58 ग्रामपंचायतींवर प्रशासकांच्या नियुक्त्या

पारोळा प्रतिनिधी- तालुक्यातील सप्टेंबर 2020 मध्ये मुदत संपलेल्या 58 ग्रामपंचायतींवर पंचायत समिती अंतर्गत कार्यरत विस्तार अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियक्ती करण्यात आली आहे.

तालुक्यात एकूण 83 ग्रुप ग्रामपंचायती आहेत. त्या पैकी 58 ग्रामपंचायतीच्या मुदती संपल्या आहेत. या ग्रामपंचायतिच्या निवडणुका घेणे क्रमप्राप्त असताना कोरोना च्या पार्श्वभूमीवर निवडणुका या प्रशासनाला तथा राज्य शासनाला घेता येणे शक्य नसल्याने त्या पुढे ढकलण्यात आले आहे. मुदत संपलेल्या या 58 ग्रामपंचायतींवर विद्यमान सदस्यांचे अधिकार हे आता संपुष्टात आले आहेत.

या ग्रामपंचायतवर ग्राम पंचायत विस्ताराधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी, शिक्षण विस्ताराधिकारी, कृषी विस्तार अधिकारी सह काही काही मुख्यसेविका यांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत.दरम्यान एका एका प्रशासककडे तीन चार ग्रामपंचायतींचा कारभार सोपविण्यात आल्याने संबंधित ग्रामपंचायतीने पुढे विविध अडचणी व समस्या निर्माण होणार आहेत. कोरोणाच्या पार्श्‍वभूमीवर तातडीने निर्णय घेणे हे ग्रामपंचायतीला आवश्यक असताना त्यात अधिक आता विलंब होणार आहे. त्यामुळे विविध पक्षीय कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास होऊन नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content