कोरोना : नगरसेवक कैलास चौधरी यांची स्वखर्चाने फवारणीस प्रारंभ

पारोळा, प्रतिनिधी । जगभर कोरोना रोगाने चांगलेच थैमान घातले असतांना शासनस्तरावर सर्वतोपरी उपाय केले जात आहेत. यात आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून नगरसेवक कैलास चौधरी व मित्र परिवार यांनी एकत्र येऊन नगरसेवक कैलास चौधरी यांनी स्व खर्चाने शहरात फवारणीच्या कामाला प्रारंभ केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पारोळा येथील वार्ड क्र. ४ चे नगरसेवक कैलास आनंदा चौधरी यांनी स्वखर्चाने सॅनिटीझर आणून वार्डातील मित्राच्या साहाय्याने प्रकाश चौधरी, सोनू चौधरी व मित्र मंडळी या तरुणांनी कोरोना रोगाला आळा बासावा म्हणून आपल्या वार्डात आपापल्या घरातील फरावणी पंपाच्या साहाय्याने टी. सि. एल. पावडर, सॅनिटीझर पाण्यात मिसडून भवानी चौक, आझाद चौक, शिवाजी विभाग, शेवडी गल्ली, लोहार गल्ली, हत्ती मंदिर परिसरात फवारणी केली. सारा जगभर कोरोना रोगाने थैमान घातले असतांना शासन , नगर पालिका, ग्राम पंचायत व सर्व शासकीय कर्मचारी सर्वोपरी प्रयत्न करीत आहेत. त्यातच गावातील या तरुणांनी व नगरसेवकाने केलेल्या फवारणीचे वार्डात व गावात चांगलेच कौतुक होत आहे. आपल्या कडून जो पर्यंत शक्य होईल तो पर्यंत गावकऱ्यांना आपण मदत करू असे नगरसेवक कैलास चौधरी यांनी यावेळी सांगितले.

Protected Content