पारोळ्यातील तीन दुकानांना आग; कोटीच्या वर नुकसान ( व्हिडीओ )

पारोळा प्रतिनिधी । शहरातील शिरसमणीकर ज्वेलर्सला पहाटे लागलेल्या आगीमुळे शेजारच्या दोन दुकानांनाही आग लागल्यामुळे कोटीच्या वर नुकसान झाल्याची घटना आज घडली. सुदैवाने आग लवकर आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.

याबाबत वृत्तांत असा की, आज पहाटे ६ वाजेच्या सुमारास बाजारपेठत गावहोळी चौकात शिरसमनीकर ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानात मीटरने अचानकपणे पेट घेतल्याने या दुकानाला आग लागली. त्या नंतर या दुकानाच्या दोन्ही बाजूला असलेले सारस्वत किरणा व सुनिल ड्रेसेस ही दोन्ही दुकाने आगीच्या लपेटात येऊन त्यात ते ही जळून खाक झाले. यात शिरसमनीकर ज्वेलर्सचे ४५ लाखांचे, सुनिल ड्रेसेस चे ९० लाखांचे तर स्वारस्वत किराणा दुकानाचे १५ लाखांचे नुकसान झाले. या नुकसानी चा पंचनामा शहर तलाठी व वीज वितरण कंपनी च्या अधिकारी वर्गाने केला.

अशी घडली दुर्घटना

पहाटे ६ वाजता शिरसमनीकर ज्वेलर्स या दुकानातून अचानकपणे धूर निघत असल्याचे रमेश अमृतकर या शेजारील रहिवाशी दुकानदाराच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ शिरसमणीकर ज्वेलर्स चे मालक सुनिल भालेराव यांना बोलून घेतले. सुनिल भालेराव यांनी आपल्या दुकानाचे शटर उघडविले असता धूर आणि आगीचे लोट बाहेर येऊ लागले. त्यात सुनिल यांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला त्यांना तेथून बाजूला केले. तात्काळ अग्निशमन बंब बोलविण्यात आले. आग आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी शर्थीचे प्रयत्न केले . पण दुकानात हवा शिरल्याने आगीने उग्र रूप धारण केले. या आगीत सुनिल ड्रेसेस चा वरचा मजला व बाजूला असलेले स्वारस्वत किराणा दुकान येऊन नुकसान झाले. तर समोरील राधिका ज्वेलर्स या दुकानाचे पुढील सर्वा शो व मिटरचे नुकसान झाले.

दुकानदाराला भोवळ

शिरसमणीकर ज्वेलर्स चे मालक सुनिल प्रभाकर भालेराव यांनी १२ लाख रुपये कर्ज काढून आपल्या जुन्या दुकानाचे नूतनीकरण करून २६ जानेवारी पासून नव्या दुकाना चा शुभारंभ केला होता. दोन महिन्या नंतर मेहनतीने उभारलेले दुकान असे आगीत बेचिराख झाले. या दुकानातील सर्व फर्निचर, पंखे , संगणक , सोफे ,काच कॅबिन ,शोच्या वस्तू विक्री साठी आणलेले सोन्याच्या व चांदीच्या वस्तू या आगीत जळून खाक झाल्यात. सोन्याच्या वस्तू वितळून त्यांचे पाणी झाले. हे सर्व पाहताच सुनिल भालेराव यांना भोवळ आली. आपले सर्व काही जळून खाक झाले. आपण रस्त्यावर आलो असे सांगत त्यांना रडू कोसळले . त्यांचे एकूण ४०-४५ लाखांचे नुकसान यात झाल्याचा प्राथमिक अंदाज पंचनाम्यात व्यक्त करण्यात आला .
यात डाव्या बाजूला असलेले सुनिल ड्रेसेस यांचे वरच्या मजल्यावर आगीने लक्ष करीत मालक इशांत जैन यांनी विकण्यासाठी आणलेले ड्रेस मटेरीयल माल जळून खाक झाला. आणि दुकानाचे फर्निचर , इतर साहित्य व दुकानाचा शो असे जळून ९० लाखांचे नुकसानी चा अंदाज व्यक्त करण्यात आला.

तर उजव्या बाजूला असलेले स्वारस्वत या किराणा दुकाना चे ही विक्री साठी आणलेले साहित्य जळून खाक झाले . तर घरात लग्न असल्याने मुलाचा लग्नाचा बस्ता व दागिने जळून १५ लाखांचे नुकसान यात झाले .असे एकूण एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान या आगीत झाले.

वीज वितरण कंपनी च्या अधिकार्‍यांना धरले धारेवर

बाजारपेठत ऐवढी भीषण आग लागली तरी वीज वितरण कंपनी चे अधिकारी घटनास्थळी येत नाही. विचारणा देखील करीत नाही .याचा रोष व्यक्त करीत आमदार डॉ. सतीश पाटील यांनी अधिकारी वर्गाला चांगलेच धारेवर धरले. या आगग्रस्त दुकानांच्या समोर एक धोकादायक इलेक्ट्रीक खांब आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो धोकादायक पोल हटविण्याची मागणी झाली .पण त्या कडे दुर्लक्ष केले गेले .सर्व्हिस वायर चा मोठा गुंता त्या पोलवर झाला आहे. आणि त्यामुळेच ही आकस्मित आग लागली असे नागरीकांनी सांगितल्या वर आमदार डॉ पाटील यांनी वीज वितरण कंपनी ने ही जबाबदारी स्वीकारूण ही नुकसान भरपाई द्यावी असे कडक शब्दात या अधिकारी वर्गाला सुनावले.

आमदार डॉ. पाटील यांची मदत

या आगीत नुकसान झालेल्या प्रत्येक दुकानदाराला आमदार डॉ सतीश पाटील यांनी व्यक्तीक पंचवीस हजार रुपयांची रोख मदत करीत त्या दुकानदारांना दिलासा दिला.

पहा: पारोळा येथील आगीबाबतचा हा व्हिडीओ.

Add Comment

Protected Content