भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विधानसभेच्या अनुसूचित जाती या राखीव प्रवर्गासाठी आतापर्यंत एकूण 22 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यापैकी आज छाननीअंती 16 उमेदवार पात्र ठरलेले असून आता यापैकी नेमके कोणकोणते उमेदवार माघारी घेणार याबाबत भुसावळ विधानसभा क्षेत्रातील मतदारांमध्ये उत्सुकता लागलेली आहे. अर्ज बाद झालेल्यांमध्ये प्रामुख्याने प्रिती तोरण महाजन यांचा समावेश असून त्यांनी काल प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याविरुद्ध जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केलेली आहे.
पात्र झालेले उमेदवार खालील प्रमाणे-
1) डॉ राजेश तुकाराम मानवतकर ( INC ) 2) राहुल नारायण बनसोडे (BSP) 3) संजय वामन सावकारे (BJP) 4) जगन्नाथ देवराम सोनवणे ( VBA) 5) अजय जिवराम इंगळे (अपक्ष)
6) गौरव धनराज बाविस्कर (अपक्ष) 7) पुष्पा जगन सोनवणे (अपक्ष) 8) प्रशांत मनोहर तायडे (अपक्ष) 9) प्रवीण नाना सुरवाडे (अपक्ष ) 10) प्रतिभा सुजित जगदाळे (अपक्ष ) 11) भूपेश विश्राम बाविस्कर (अपक्ष) 12) रवींद्र बळीराम सपकाळे (अपक्ष) 13) शेख रहीम शेख अहमद (अपक्ष) 14) शैलेश प्रभाकर बोदडे (अपक्ष) 15) सुशील ज्ञानेश्वर मोरे (अपक्ष) 16) स्वाती श्रीकांत बाविस्कर (अपक्ष)
अपात्र उमेदवार यांची यादी खालीलप्रमाणे-
१) उज्वला गजानन चंदनकर २) प्रिति तोरण महाजन ३) कीर्ती सुरेश वानखेडे ४) सुरेश वामन केदारे ५) अनुपकुमार प्रेमचंद मनुरे६) रजनी संजय सावकारे वरील सर्व पात्र आणि अपात्र उमेदवार त्यांच्या नामनिर्देशन पत्रांच्या छाननीअंती भुसावळ विधानसभा निवडणुकीचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी आज ३० ऑक्टोबर रोजी घोषित केलेले आहे.