Home Cities जळगाव दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त अंत्योदय दिवस उत्साहात साजरा

दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त अंत्योदय दिवस उत्साहात साजरा

0
16


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, मु. जे. महाविद्यालय येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त अंत्योदय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील उपप्राचार्या राजश्री महाजन, पर्यवेक्षिका शिल्पा सरोदे, कला व वाणिज्य समन्वयक प्रा. उमेश पाटील, विज्ञान समन्वयक प्रा. गुणवंत वंजारी यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.

उपप्राचार्या राजश्री महाजन यांनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिनेश महाजन यांनी केले. त्यांनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनप्रवासाची माहिती देत त्यांच्या विचारांवर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे अध्यक्ष प्रा. एस. के. वानखेडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


Protected Content

Play sound