यावल प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील विविध तालुके व शहरी भागात कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारीचा उपाय म्हणुन आरोग्य यंत्रणा अधिक सज्ज व सर्तक झाली असुन आज शहरात नगर परिषदच्या स्वतंत्र विभागाच्या माध्यमातुन विनाकारण अनावश्यक फिरणाऱ्या व काही व्यापारी तसेच दुकानदार आणि हॉटेल व्यवसायीक अशा १०० नागरीकांची ॲन्टीजन तपासणी करण्यात आली आहे.
यावल शहरात आज शुक्रवारचा दिवस हा बाजार दिवस असतो. मात्र कोरोना संसर्ग वाढल्याच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी यांनी संपुर्ण आठवडे बाजार बंद ठेवले असुन देखील नागरीकांची मोठी वर्दळ आज शहरात दिसुन येत होती. दरम्यान यावल नगर परिषदच्या वतीने कनिष्ठ अभियंता विजय बडे, स्वच्छता विभागाचे अधिकारी शिवानंद कानडे, रवी काटकर, दिनेश घारू यांच्या पथकाने काजीपुरा मस्जीद पासुन तर म्हसोबा मंदीर, बोरावल गेट या मुख्य बाजारपेठेत केलेल्या ॲन्टीजन तपासणी मोहीमेत शहरातील विविध भागात संचारबंदीचे उल्लंघन करून सुमारे १००जण हे अनावश्यक फिरतांना आढळुन आल्याने या पथकाच्या वतीने कार्यवाही करीत त्यांची ॲन्टीजन तपासणी केली यात एक जण हा पॉझीटीव्ह मिळुन आल्याची माहिती नगर परिषदच्या सुत्रांकडुन मिळाली.