मुंबई वृत्तसंस्था । कोरोनावर मात केल्यानंतर पुन्हा कोरोना होत असल्याचं उघड झाल्यानंतर आता शरीरातील अँटिबॉडिजबाबतही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मुंबईतील जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या स्टाफवर करण्यात आलेल्या सर्व्हेतून करोनावर मात केल्यानंतर फक्त काही महिनेच शरीरात अँटिबॉडिज राहतात असं आढळून आलं आहे. त्यामुळे लस तयार करण्यासाठी संशोधनातून पुढे आलेली ही माहिती अत्यंत उपयोगी ठरणार आहे.
अँटिबॉडिज या शरीरातील प्रतिरोधक प्रणालीचा एक भाग आहेत. इम्युनोग्लोब्यूलिंस नावच्या प्रोटिन्सचं तत्व त्यात असतं. अँटिडबॉडिजला अँटिजनही म्हणतात. सर्च बटालियनच्या स्वरुपात अँटिबॉडिज शरीरात काम करत असतात.
वेगवेगळ्या अँटिजेनसाठी वेगवेगळ्या अँटिबॉडिज असतात. शरीरातील कोशिकांमधून निघून अँटिजन शोधून त्याला या अँटिबॉडिज चिपकतात आणि या अँटिजनला मारण्याचं काम करतात. एखाद्या रोगावर शरीराने मात केल्यानंतर त्या रोगाविरोधातील अँटिबॉडिज शरीरात तयार होतात. त्यामुळे भविष्यात त्याच आजारापासून तयार होणाऱ्या इन्फेक्शन विरोधात या अँटिबॉडिज प्रतिकारशक्ती म्हणून काम करत असतात.