पहूर पुलाजवळ पुन्हा अपघात : मोठी दुर्घटना टळली

पहूर, ता .जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | छत्रपती संभाजी नगर कडून जळगाव कडे जाणार्‍या कारची रस्ता दुभाजकाची धडक बसल्यानंतर चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली असली तरी पूल परिसरातील अपघातांची मालिका सुरूच असून याबाबत कार्यवाहीची मागणी होत आहे.

पत्रकार संघटनेने पुकारलेल्या आंदोलनानंतर महामार्ग प्राधिकरण झोपेतून खाडकन जागे झाले असून युद्ध पातळीवर काम सुरू झाले आहे. याच कामामुळे सध्या शनि महाराज मंदिरासमोरील चौकात भुलभुलय्या सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच छत्रपती संभाजी नगर कडून जळगाव कडे जाणार्‍या एम . एच . १९ डी . व्ही . ८८८७ हेअर टाटा कारची रस्ता दुभाजकाला धडक बसल्याने सदर कार पुढे झेपावली. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून वेगावर नियंत्रण मिळवत तीस फूट खोल खड्ड्यात जाण्यापासून कारला वाचवल्याने मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान, अपघात ग्रस्त कार काढताना महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पहूर पोलिसांचे सहकार्य लाभले.

Protected Content