चोपडा, प्रतिनिधी | सरदार वल्लभभाई पटेल सेवाभावी शैक्षणिक संस्था संचलित श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल गलंगी येथे १० वा वार्षिक क्रीडा उत्साह २०१९-२० जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन कांतीलाल अभिमन पाटील हे होते.
या १० वा वार्षिक क्रीडा उत्साहाला प्रमुख पाहुणे म्हणून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे एपीआय संदीप आरक, चोपडा तालुका क्रिडा समन्वयक राजेंद्र पंढरीनाथ अल्हाट, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप धनगर उपस्थित होते. दोन दिवस चालणाऱ्या या क्रीडा उत्सवात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये कबड्डी , १०० व ६० मीटर रनिंग , मॉडीफाय रीले , सॅक रेस , रायफल शूटिंग, लॉंग जंप, मेडिसिन बोल, शॉट पुट थ्रो, स्टॅंडिंग ब्रोड जम्प, डिस्क थ्रो, शटल रन यासारख्या विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडास्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावत गोल्ड, सिल्वर ,तसेच ब्रांच मेडल मिळविले. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संस्थेचा सचिव स्नेहलता कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शाळेचे प्रिन्सिपल रणछोड अभिमान पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पाडण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटक तसेच सगळ्या प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल, सिल्वर मेडल , व ब्रांच मेडल तसेच प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित केले. या कार्यक्रमाला अनेर परिसरातील अनेक पालकांची उपस्थिती लाभली. तसेच क्रीडा शिक्षक व इतर शिक्षक वृंद यांच्या सहकार्याच्या मदतीने वार्षिक क्रीडा उत्सव मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.