अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत गुरूवारी ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता नगरपरिषदेच्या सभागृहात होणार आहे. याबाबत तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी माहिती देत ग्रामस्थांना सोडतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

१ जानेवारी २०२४ ते ४ मार्च २०२५ दरम्यान सरपंच पदाची मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये हिंगोणे बुद्रुक, दहिवद, दहिवद खुर्द, कुर्हे खुर्द, मालपूर, खडके, लोण सीम, लोण बुद्रुक, तळवाडे, निसर्डी, धार, रणाईचे बुद्रुक आणि रणाईचे खुर्द या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
या १३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी होणाऱ्या आरक्षण सोडतीला ग्रामस्थांची उपस्थिती महत्त्वाची आहे. हा कार्यक्रम पारदर्शकपणे पार पडणार असल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केले आहे. ग्रामपंचायतींच्या विकास प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी ग्रामस्थांनी या प्रक्रियेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असेही त्यांनी आवाहन केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तयारी सुरू केली असून, या आरक्षण सोडतीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.