अण्णा हजारे यांच्या उपोषणास प्रारंभ

राळेगणसिध्दी । ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज सकाळपासून सरकारविरूध्द उपोषणास प्रारंभ केला आहे.

कालच राज्य सरकारने अण्णा हजारे यांनी केलेली लोकायुक्तांची मागणी मान्य केली. यामुळे अण्णा हजारे यांनी उपोषण करू नये अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. राज्यात लोकायुक्त नियुक्त करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्याच्या निर्णयाचे हजारे यांनी स्वागत केले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला असला तरी विधानसभेच्या मंजुरीशिवाय त्याचे कायद्यात रूपांतर होणार नसल्याने आपण आंदोलनावर ठाम असल्याचे हजारे यांनी सांगितले.तथापि, अण्णा हजारे यांनी मात्र ठाम भूमिका घेत उपोषण सुरू केले आहे. अण्णा हजारे यांनी राळेगणसिध्दी येथील यादवबाबा मंदिरात उपोषण सुरू केली आहे. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धी येथे येणार होते. मात्र गिरीश महाजन राळेगणसिद्धीला अण्णांच्या भेटीला येणार असले तरी अण्णांनी त्यांना भेटण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांनी आधी अण्णांच्या आंदोलनाला मागे घेण्यात महत्वाची भूमिका पार पाडली होती. तथापि, अण्णा हजारे यांनी मात्र सध्या तरी आंदोलन सुरू केले आहे.

Add Comment

Protected Content