अण्णा हजारे यांचे आंदोलन मागे

राळेगणसिध्दी प्रतिनिधी । ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज अखेर सातव्या दिवशी आपले आंदोलन बंद मागे घेतले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह समितीने तब्बल ६ तास अण्णांशी बंद खोलीत चर्चा केली. दोन वाजता सुरु झालेली बैठक सातच्या सुमारास संपली. लोकपाल कायद्याचा जुना मसुदा व अण्णा हजारे यांनी सरकारला दिलेला मसुदा या दोन्ही मसुद्यातील काही मुद्दे एकत्र करून नवा मसुदा तयार करण्यात आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लिंबू-पाणी घेऊन हजारे यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी राळेगणमध्ये जलसंपदामंत्री गिरीष महाजन, संरक्षण मंत्री सुभाष भामरे, आदर्श गाव समितीचे पोपट पवार उपस्थित होते.

Add Comment

Protected Content