मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | महाविकास आघाडीतील मंत्री अनिल परब यांची जमीन शिवसेनेचे रामदास कदम यांच्या भावाने खरेदी केली असून तो त्यात भागीदार असल्याचा भाजपचे किरीट सोमय्या यांनी दावा केला आहे.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका काही दिवसांपूर्वी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेत, अनिल परब यांनी एन प्लॉटसाठी खोटी कागदपत्रे तयार केली असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.
इडीच्या कारवाईत अनिल परब म्हणत आहेत की रिसॉर्ट सदानंद कदम यांच्या भागीदाराचा आहे. सदानंद कदम हे रामदास कदम यांचे लहान भाऊ असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीले आहे की, मी अर्जदार सदानंद कदम, रत्नागिरी, ग्रामपंचायत नमुना ८ या अभिलेखात नोंद होणे बाबत. वरील विषयाने आपणास कळवू इच्छितो की मी सदानंद कदम मौजे मुरुड येथील गट क्रमांक ४४६ व येथील मालमत्ता क्रमांक १०७४ ही अनिल परब यांच्या नावे दाखल असून मी खरेदी केली आहे. ती माझ्या नावाने करावी ही विनंती. सोबत खरेदी पत्र आणि बाकी कागदपत्रे देत असल्याचे २७ जानेवारी २०२१ च्या पत्रात म्हटले आहे. हि सर्व कागदपत्रे महाराष्ट्राचे पोलीस संचालक रजनीश सेठ यांची भेट घेत दिली असल्याचेही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.