धुळे प्रतिनिधी । एकनाथराव खडसे यांनी स्पष्ट उल्लेख केला नसतांनाही गिरीश महाजन यांना मिरच्या लागल्या असून यामुळे नाथाभाऊंनी फेकलेली टोपी फिट बसल्याचा टोला माजी आमदार अनिल गोटे यांनी एका निवेदनाद्वारे लगावला आहे.
धुळे येथील माजी आमदार अनिल गोटे यांनी अलीकडच्या काळात भाजप आणि विशेष करून फडणवीस आणि गिरीश महाजन यांना टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अलीकडच्या काळातील घडामोडींच्या पार्श्वभूमिवर, त्यांनी सोशल मीडियात एक पोस्ट शेअर केली असून यात पुन्हा या दोन्ही नेत्यांचा टार्गेट करण्यात आले आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की,
:-भारतीय जनता पार्टीतील गटबाजीला देवेंद्र अँड कंपनीचे चांगले कुजलेले खत घालून वाढवलेल्या विषवल्ललीचा असर विधानसभेच्या १२२च्याजागांची घसरगुंडी १०५ जागा येण्यापर्यत झाली. आपल्याच पक्षातील प्रभावशाली नेत्यांच्या पराभवाकरीता केलेल्या कारस्थानाचे परिणाम जस जसे प्रकर्षाने समोर येत आहेत. व देवेंद्र अँड कंपनीच्या संचालकांकडे संशयाच्या होकायंत्र दिशा दर्शन करीत आहे तस तसी अस्वस्थता वाढत आहे. खरे तर, नाथाभाऊंनी एकाही करस्थान्याचा नामोल्लेख केलेला नाही. पण चोरांच्या मनात चांदणे अशी अवस्था मिरीश महाजनांची का व्हावी? हे सहज लक्षात येण्या सारखे आहे. नाथाभाऊंनी आपल्या निवेदनात स्पष्टपणे नमुद केले आहे की, पक्षश्रेष्टींकडे मी लेखी तक्रार केली आहे. भाजपा शिस्तबद्ध (?) पक्ष आहे.पक्षनेतृत्व नाथाभाऊकडे आवश्यकते स्पष्टीकरण मागवतील. पण तत्पूर्वीच देवेंद्र अँड प्रा.लि कंपनीचे संचालक मंडळ अस्वस्थ झाले आहे.
नाथाभाऊंनी पक्ष शिस्त व राजकीय सभ्यता बाळगून कोणाचाही नामोउल्लेख केलेला नाही. असे असतांना गिरीश महाजनांना मिरच्या लागण्याच कारण काय ? म्हणजेच नाथाभाऊंनी फेकलेली टोपी फिट बसल्याचे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, अबकी २२०-२५० के पार !अशी दर्पोक्ती करणार्या वाचाळवीरांनी भाजपा व देवेंद्र फडवणीस अँड प्रा. लि.कंपनी यांना एकाच खड्ड्यात घातले. हे ज्या दिवशी फडवणीसांच्या लक्षात येईल त्या दिवसपासून त्यांच्या दुर्भाग्याचे फेरे सपंपायला सुरवात होऊ शकते. देवेंद्र फडणवीसांनी तर, राजकीय विरोधकांची जागा सुध्दा रिक्त राहु दिली नाही. त्याच्या मित्रांनीच हे काम पूर्णत्वास नेले. अब की बार २२० के पार! असे म्हणणार्यांना जनतेने अब की बार आपटी बार और सत्ता के बहार अशी जबरदस्त पटकी देऊन माजच उतरवून टाकला असल्याचा अनिल गोटे यांनी यात नमूद केले आहे.