अनिल देशमुख यांच्या कोठडीत वाढ

मुंबई प्रतिनिधी | १०० कोटी रूपयांच्या कथित वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पीएमएलए न्यायालयाने आज पुन्हा तीन दिवसांच्या ईडीची कोठडी सुनावली आहे.

कथित वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. प्रारंभी त्यांना त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. ६ तारखेला त्यांची कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांच्या कोठडीत १२ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यामुळे आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी त्त्यांचे वकील इंदरपाल सिंग यांनी कोर्टासमोर युक्तिवाद केला.

दरम्यान, अनिल देशमुख ईडीला सहकार्य करत असल्याने त्यांना जामीन मिळायला हवा, असा युक्तिवाद सिंग यांनी केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर ईडीच्या वकिलांनी देशमुख यांच्या जामिनाला विरोध करत त्यांना कोठडी देण्याची मागणी केली होती. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर देशमुख यांना १५ नोव्हेंबरपर्यंतची ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे देशमुख यांना तीन दिवस ईडीच्या कोठडीत राहावं लागणार आहे.

Protected Content