एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्यपदी येथील आनंदा चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्ती बाबत त्यांचे पारोळा बाजार समितीचे सभापती अमोल पाटील,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, तालुका प्रमुख वासुदेव पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, राजेंद्र चौधरी, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, नगरसेवक कृणाल महाजन, अतुल महाजन, पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल महाजन, परेश बिर्ला, चिंतामण पाटील, संभाजी पाटील, विवेक पाटील, रेवानंद ठाकुर, शरद ठाकुर आदींनी अभिनंदन केले आहे.