अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर येथील माध्यमिक विद्यालय लोन ग्रुप येथे विविध विकास कामांचा शुभारंभ तसेच मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. अनिल पाटील खा. स्मिता वाघ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांचा भव्य सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला.
ग्रामीण भागाच्या विकासात शैक्षणिक परिसराचा विकास होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ना.अनिल पाटील यांनी याप्रसंगी बोलताना ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेचे आपण देणे लागतो या भावनेतून शाळेला सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून देत आहे असे अशोक पाटील यांनी सांगितले तर खा. स्मिता वाघ यांनी शाळेतर्फे करण्यात आलेल्या सत्कार बद्दल ऋण व्यक्त करीत शाळेला योग्य ती मदत करू! असे आश्वासन दिले. माध्यमिक विद्यालय लोण येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांच्या दातृत्वातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. मंदाकिनी भामरे यांच्यातर्फे रंगमंच अद्ययावतीकरण,रविंद्र पाटील यांचेतर्फे वॉटर प्युरिफायर साठी मदत देण्यात आली.यावेळी ना. अनिल पाटील, खा. स्मिता वाघ, अशोक पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक चंद्रशेखर ठाकूर यांनी तर सूत्रसंचालन अमळनेर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांनी केले. प्रमुख सत्कारार्थी मान्यवरांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक स्कूल कमेटी चेअरमन शिवाजी नत्थु पाटील, किसन पाटील,विजय जैन,किरण पाटील, दिपक पाटील, सौ. उषा पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी मंचावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक समाधान धनगर, हिरालाल पाटील, भाईदास भिल, शरद पाटील, मुख्याध्यापक महेश पाटील, ज्येष्ठ नेते एल. टी. पाटील, माजी नगरसेवक विक्रांत पाटील, पोलिस निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी, वि. का. सो.चेअरमन संगिता पाटील, व्हा.चेअरमन नाना पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीस शालेय विद्यार्थ्यांनी इशस्तवन व स्वागत गीत सादर केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हर्षल पाटील यांनी केले.