साकेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । साकेगाव येथील रहिवासी व शिवसैनिक अशी ओळख असलेले बबलू धनगर यांची नुकतीच उपजिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आलेली आहे. ही निवड शिवसेनेचे मुखपत्र असलेले सामना मधून 13 रोजी बबलू धनगर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. आनंद धनगर हे अवघ्या 30 वर्षाचे असून एकदम प्रतिकूल परिस्थितीवर मात करत करत आज त्यांची शिवसेनेच्या युवा उपजिल्हाप्रमुख पदी निवड केल्याने साकेगाव सह परिसरातील अनेकांच्या बुवा उंचावले आहेत.
आनंद धनगर हे प्रत्येकाच्याच सुखदुःखात नेहमीच सतत कार्यरत असतात, याचीच कार्याची पावती म्हणून आनंद धनगर यांची थेट युवा जिल्हा उपप्रमुख पदी निवड करण्यात आली असल्याचे पत्र माननीय युवा सेनेचे युवासेना प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य उद्धव ठाकरे व शिवसेना सचिव वरूण सरदेसाई यांचे निकटवर्तीय म्हणून सुद्धा त्यांची ओळख असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या निवडीबद्दल साकेगाव सह परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा मोठा वर्षाव होत आहे