Home क्राईम Breaking : अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला उडविले; एक ठार, दुसरा गंभीर !

Breaking : अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला उडविले; एक ठार, दुसरा गंभीर !

0
313

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरापासून जवळच असलेल्या गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ शुक्रवारी पहाटे एक भीषण अपघात घडला. एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने कडगाव येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. संजय पोपट पाटील (वय २७, रा. कडगाव, ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

अपघाताचा घटनाक्रम आणि जखमीचा बचाव
संजय पाटील हा आपल्या आई-वडील आणि बहिणीसोबत कडगावात राहत होता आणि मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. १२ सप्टेंबर रोजी पहाटे तो आपला मित्र गणेश बाबुराव बाविस्कर (वय ३५, रा. कडगाव) याच्यासोबत दुचाकीवरून जळगावहून कडगावकडे निघाला होता. गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजसमोर पोहोचताच, समोरून भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, संजय पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र गणेश बाविस्कर गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेतली आणि जखमी गणेशला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर संजय पाटील यांच्या आई-वडिलांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. एकुलत्या एका मुलाचा मृतदेह पाहून त्यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यांच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारानेही रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. संपूर्ण कुटुंब आणि गावकऱ्यांवर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound