धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी तरूणाचा मृत्यू

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पाचोरा रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेतून ३८ वर्षीय अनोळखी तरूण पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तरूणाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.

याबाबत माहिती अशी की, पाचोरा रेल्वेस्थानक येथे धावत्या रेल्वेतून  २१ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास अनोळखी इसमाच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरची घटना रेल्वे खंबा ३७२ / १९ नजीक घडली आहे. मयत तरूणाचे अंदाजे वय ३८ वर्ष असुन उंची ५ फुट ६ इंच, गौरवर्ण, नाक सरळ, डोक्याचे केस बारीक, चेहरा लांबट, शरिर बांधा मध्यम, अंगावर हिरव्या रंगाचा शर्ट, त्यावर सफेद हाफ शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट परिधान केलेले आहे. मयत इसमाबाबत कोणास काहीही माहिती असल्यास त्यांनी भ्रमणध्वनी क्रमांक ९०२८१५२९६७ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन पाचोरा रेल्वे पोलिसांनी केले आहे. या घटनेचा पुढील तपास चाळीसगाव प्रभारी अधिकारी शब्बीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक ईश्वर बोरुडे हे करित आहे.

 

Protected Content