जळगाव प्रतिनिधी । शहरातील सलार नगरात कुरिअर आल्याचे भासवत भरदिवसा उघड्या घरातून ७ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार आज दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बबिता भाईमिया शेख (वय-४५) रा.सलार नगर ह्या गृहीणी आहेत. आज ३ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास त्या घरात एकट्या असतांना मागच्या वाड्यात भांडे धुवत होत्या. त्यावेळी घराचा दरवाजा उघडा होता. त्यांनी त्यांचा ७ हजार रूपये किंमतीचा मोबाईल शोकेस मध्ये ठेवला होता. त्यावेळी अनोळखी व्यक्ती येवून म्हणाला की, दिदी आपका कुरिअर आया है असे बोलून घराच्या बेडरूमपर्यंत आला. आमचे कुठलेही कुरिअर वगैरे नाही तुम्ही इथून जाव असे बोलल्याने तो घरातून निघून गेला. त्यानंतर थोड्यावेळानंतर भांडे धुवून झाल्यानंतर मोबाईल पाहण्यासाठी गेले असता जागेवर मोबाईल दिसून आला नाही. त्याच व्यक्तीने आपला मोबाईल चोरून नेल्याचे लक्षात आल्याने त्यांनी शहर पोलीसात धाव घेतली. बबिता शेख यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.