किरकोळ कारणावरून मायलेकाला लाकडी दांडक्याने मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील पाथरी गावात बहिणीच्या घरी मानताच्या कार्यक्रमासाठी आलेल्या एका तरुणासह त्याच्या आईला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिकृत असे की, पारोळा तालुक्यातील खेडीडोके येथे गणेश गोकुळ पाटील वय-२३ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. जळगाव तालुक्यातील पाथरी येथे त्यांची बहिणीच्या घरी मानता देण्याच्या कार्यक्रम होता. त्यासाठी गणेश पाटील हे त्यांचे आई सुनीता पाटील यांच्यासोबत सोमवारी १२ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता कार्यक्रमासाठी आलेले होते.

दरम्यान गावात राहणारा बापू रमेश पाटील याने गणेश पाटील याला शिवीगाळ करत, “या गावात का आले, तुमच्या या गावाशी काही संबंध नाही” असे बोलून लाकडी दांडक्याने गणेश पाटील आणि त्यांची आई सुनीता पाटील यांना मारहाण केली. या मारहाणी मध्ये दोघं गंभीर जखमी झाले. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर बुधवारी १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता गणेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बापू रमेश पाटील रा. पाथरी ता. जळगाव याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ स्वप्निल पाटील हे करीत आहे.

Protected Content