जुन्या वादातून वृध्दाला स्टीलच्या रॉडने बेदम मारहाण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या वादातून एका सेवानिवृत्त व्यक्तीला शिवीगाळ करून स्टीलच्या रॉडने मारहाण करून जखमी केल्याची घटना जळगावात घडली आहे. एमआयडीसी पोलीसात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शेख शकील शेख दगु (वय-६५) रा. फैजपूर ता. यावल ह.मु.फातेमा नगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते सेवानिवृत्त कर्मचारी असून आता घरीच असतात. शेख शकील यांच्या सोबत अल्ताफ सैय्यद यांच्याशी जुना वाद झालेला आहे. दरम्यान, रविवार ८ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेख शकील हे घरी असतांना त्याठिकाणी अल्ताफ सैय्यद, तब्बसुम अल्ताफ सैय्यद, गोलू अल्ताफ सैय्यद, शिरीन अशपाक शेख , अशपाकचा साला (नाव माहित नाही) सर्व रा. फातेमा नगर यांनी शेख शकील यांना शिवीगाळ करून स्टीलच्या रॉडने मारहाण करून जखमी केले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. शेख शकील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी  अल्ताफ सैय्यद, तब्बसुम अल्ताफ सैय्यद, गोलू अल्ताफ सैय्यद, शिरीन अशपाक शेख , अशपाकचा साला (नाव माहित नाही) सर्व रा. फातेमा नगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.

 

Protected Content