वाघुर नदीच्या पाटचारीत वृध्दाचा पाण्यात बुडून मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील ६५ वर्षीय वृध्दाचा वाघुर नदीच्या पाठचारीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज गुरूवारी दुपारी २ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  भास्कर पुना येवले (वय-65, रा. विठ्ठल मंदिर जवळ, चौधरी वाडा, नशिराबाद जि.जळगाव. हे आज १ जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेताच्या कामाच्या निमित्ताने घरातून बाहेर पडले. दरम्यान दुपारी २ वाजेच्या सुमारास तालुक्यातील सुनसगाव रस्त्यावरील असलेल्या जगन पाटील यांच्या शेताजवळ वाघुर नदीच्या पाटचारीतील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली.  विकास वाणी रा. नशिराबाद यांच्या खबरीवरून नशीराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण करीत आहे.

Protected Content