फोटोग्राफी करणाऱ्या तरुणाचं राहत्या घरात घेतला टोकाचा निर्णय.. नातेवाईकांचा आक्रोश

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील मुन्सिपल कॉलनी येथील ३० वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शनिवारी १८ मे रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. पराग अनिल ठोंबरे वय-३० रा. मुन्सिपल कॉलनी, जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील रामानंदनगर जवळील मुन्सिपल कॉलनी येथे पराग ठोंबरे हा त्याचे आई, वडील, पत्नी आणि तीन वर्षाचा मुलगा यांच्यासह वास्तव्याला होता. फोटोग्राफीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान शुक्रवारी १७ मे रोजी रात्री परागने कुटुंबासह जेवण केले व झोपला. त्यानंतर मध्यरात्री त्याने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १८ मे रोजी पहाटे ५.३० वाजता त्याची आई लताबाई यांच्या लक्षात आले. मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून त्यांनी एकच हंबरडा फोडला. यावेळी शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ त्याला खाली उतरून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषित केले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. त्याच्या पश्चात आई लता, पत्नी शितल, तीन वर्षाचा मुलगा शंभू आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content