सनशाईन क्राफ्ट पेपर मिल येथील अपघातात जखमी झालेल्या कर्मचाऱ्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव । येथील एमआयडीसी औद्योगिक परिसरातील सेक्टर व्ही. 43 येथील सनशाईन या पेपरमिलमध्ये एका कर्मचाऱ्याचा काल कन्व्हेअर बेल्ट ( पट्टा ) मध्ये हात अडकल्याने आणि छातीस मार लागल्याने तो कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली होती. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री त्याचा दुर्दैवी मृत्यू ओढवला .

जानकीराम राजवंशी ( वय 35 ) रा. एमआयडीसी जळगाव असे कर्मचाऱ्यांचे नाव हे आहे .तो जळगाव येथे औद्योगिक वसाहत परिसरात वास्तव्यास होता.  सदर कर्मचाऱ्यावर जिल्हापेठ परिसरात असणाऱ्या सुपरिचित डॉ.ए. जी.भंगाळे सर्जिकल अँड नर्सिंग होम या हॉस्पिटलमध्ये प्रारंभी उपचार करण्यात आले. त्याचा एम आय आर काढण्यात येऊन त्याला वाचविण्यासाठीचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते. त्यानंतर त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले, त्याच्यावर उपचार सुरू असताना मात्र रात्री त्याची प्राणज्योत मावळली .दरम्यान, या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. सनशाईन ( क्राफ्ट ) या पेपर्स बनवणाऱ्या कारखान्यात जानकीराम राजवंशी हा कर्मचारी होता. त्याचा हात मशीनच्या बेल्टमध्ये ओढला गेल्याने हाताला फ्रॅक्चर आणि छातीस मार लागला होता . त्यास लागलीच सहकाऱ्यांनी उपचारार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र त्याचा दुर्दैवी मृत्यू ओढवला गेला आहे. त्याबाबत औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात कळविण्यात आले आहे.

 

Protected Content