खडसेंच्या संभाव्य पक्षांतराबाबत राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण

मुक्ताईनगर छबीलदास पाटील । माजी मंत्री एकनाथराव खडसे हे पक्षांतराच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत असतांनाच त्यांच्या संभाव्य पक्ष बदलाबाबत राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.

याबाबत वृथ्त असे की, राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ राव खडसे अनेक दिवसापासून राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा रंगलेली आहे. तथापि, याबाबत अद्यापही चित्र स्पष्ट होत नसल्याने राजकीय वर्तुळात संभ्रमावस्था पसल्याचे दिसून येत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीव्हीसमोर जाऊ नका असा सल्लाही त्यांनी माजी मंत्री खडसे यांना दिला असताना देखील ते पक्षांतर करण्याच्या मूडमध्ये असल्याचे दिसून येत आहे.

एकनाथराव खडसे राष्ट्रवादी जाणार का हा खरा प्रश्‍न आहे कारण मुक्ताईनगर मध्ये भाजपा कार्यकर्ते मध्ये गट दुरावा निर्माण होताना ही दिसून येत आहे तसेच भाजप राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या संभ्रम दिसून येत आहे.  खडसेंनी पक्षांतर केल्यास त्यांच्या सोबत कोण जाणार ? आणि आधीपासून राष्ट्रवादीत असलेले त्यांचे नेमके कसे स्वागत करणार याबाबत चर्चा होतांना दिसून येत आहे. तर खडसे भाजपमधून गेल्यानंतर तालुक्यातील पक्षाच्या नेतृत्वाची धुरा कुणाकडे येणार ? पक्षाला वाढविण्याचे काम कोण करणार याबाबतही चर्चा होत आहे.

दरम्यान, खडसे यांच्या आगमनामुळे राष्ट्रवादीतील विद्यमान पदाधिकार्‍यांची भूमिका, याबाबत आ. चंद्रकांत पाटील व त्यांच्या सहकार्‍यांची भूमिका या सर्व बाबी अद्याप स्पष्ट झालेल्या नसल्याने याबाबत एकच चर्चा रंगली आहे. अर्थात, यातून अद्याप तरी संभ्रमाचेच वातावरण दिसून येत आहे.

Protected Content