गिरड सोसायटीच्या चेअरमनपदी डॉ. प्रदीपकुमार बाहेती

पाचोरा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गिरड विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी डॉ. प्रदीपकुमार बाहेती तर व्हाईस चेअरमनपदी संध्या पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

 

संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागुन असलेल्या गिरड विविध कार्यकारी सोसायटीच्या चुरशीच्या लढती नंतर माजी जि. प. सदस्य, माजी वि. का. सो. चेअरमन पुरस्कृत परिवर्तन पॅनलचा पराभव करत सहकार पॅनलने मोहन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपलं वर्चस्व कायम ठेवले आहे.गिरड सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड माजी पंचायत सभापती भडगाव मोहन पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यात चेअरमनपदी डॉ. प्रदीपकुमार बाहेती तर व्हाईस चेअरमनपदी संध्या पाटील यांची बिनविरोध निवड करून सहकार क्षेत्रात एक नविन आदर्श ठेवण्यात आला आहे. तसेच या वि. का. सोसायटीमध्ये गेल्या २५ वर्षांपासून मोहन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व असून एकीकडे सहकारात संस्था डबघाईस जात असतांनाच्या काळात गिरड सोसायटीच्या पारदर्शक कारभारामुळे या सोसायटीने जिल्हात वेगळे स्थान निर्माण केले आहे. या निवडीप्रसंगी मोहन पाटील यांनी नवनिर्वाचित चेअरमन डॉ. प्रदिपकुमार बाहेती व व्हाईस चेअरमन संध्या पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नवनिर्वाचित सदस्य प्रल्हाद पाटील, हिराबाई पाटील, मोहन पाटील, आनंदा कोळी, सुभाष पाटील, कैलास धनगर, अनिल पाटील, प्रकाश पाटील, नरेंद्र पाटील, दिपक सोनवणे, निवडणुक निर्णय अधिकारी वळवी, संस्थेचे सचिव प्रशांत पाटील व कर्मचारी वृंद उपस्थीत होते.

Protected Content