चोपडा नगरपालिकेची दवंडी बेजबाबदारपणाची-महाजन

चोपडा प्रतिनिधी। चोपडा नगरपालीकेने अतिवृष्टीबाबत शहरात दिलेली दवंडी ही बेजबाबदारपणाची असल्याचा आरोप कॉम्रेड महाजन यांनी एका पत्रकान्वये केला आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष लाल बावटा शेतमजूर यूनियनचे नेते कॉ अमृतराव महाजन यांनी यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अतिवृष्टी असो कि कोणतीही अस्मानी वा सूलतानी आपत्ती असो त त्यावेळी प्रत्येक नागरिक हा सुरक्षित रहाण्याचा आटोकाट प्रयत्न करतोच… आणि सावधही असतो. तरीही आपत्तिने त्याचेवर मात केल्यास प्रशासनाने त्याना मदत केली पाहीजे. विशेषतः अतिवृष्टीच्या आपत्ती प्रथम झोपडपट्टी वासी नदीनाल्याकाठचे लोकांना जास्त झळ पोहचते. अशा वेळेस नगरपालिका प्रशासन असो वा शासन यांना जबाबदारी झटकून चालणार नाही. या पार्श्‍वभूमिवर, चोपडा नगरपालीकेने दिलेली जाहीर दवंडी बेजबाबदार चुकीची असून नगरपालीकेला जबाबदारीतून दूर रहाता येणार नाही. यासोबत त्यांनी नागरीकांना शुद्ध पाणी नगरपालीका दवाखान्यात योग्य त्या औषधी साठा आणि तज्ञ डॉक्टर कर्मचारी सेवा सज्ज ठेवावी अशी मागणीही केली आहे. तसेच नगरपालीकेने जबाबदारीतून पळ काढल्यास नागरीकांचे तशाही परिस्थितीत आक्रोश आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यानी दिला आहे.

Protected Content